Friday, April 25, 2025
Homeनगरनामदार कोण? जिल्ह्याच्या नजरा !

नामदार कोण? जिल्ह्याच्या नजरा !

विखेंचे नाव अग्रक्रमावर || राजळे, शिंदे, कर्डिलेंपैकी संधी कोणाला ?

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

रविवारी सायंकाळी होणार्‍या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार, याकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत. विस्तारात भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव निश्चित मानले जात आहे. मात्र पक्षातून आ.मोनिका राजळे, विधान परिषद सदस्य राम शिंदे आणि आ.शिवाजीराव कर्डिले यांचेही नाव चर्चेत आहे. दुसरीकडे शिवसेनेतून संधीबाबत कोणतीही चर्चा नसताना राष्ट्रवादीकडून जिल्ह्यातून मंत्रीपदाची संधी आक्रसल्याची शक्यता समोर आली होती.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर सर्वांच्या नजरा रविवारी हिवाळी अधिवेशनच्या तोंडावर होणार्‍या मंत्रिमंडळ विस्तारावर आहेत. या विस्तारात जिल्ह्यातून कोणाला संधी मिळणार, याविषयी आठवडाभरापासून चर्चा झडत आहेत. आ.राधाकृष्ण विखे पाटील रविवारी शपथ घेणार, याचा विश्वास त्यांच्या समर्थकांत आहे. शनिवारी माध्यमांशी बोलताना आ.विखे यांनी आगामी शंभर दिवसांचा आराखडाही बोलून दाखविला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेटही घेतली.

यातून त्यांना संधी निश्चित असल्याचे संकेत मिळाले. महायुतीला साथ देणार्‍या जिल्ह्यातून आणखी एकाला भाजप संधी देणार, अशी चर्चा आहे. आ.मोनिका राजळे, आ.राम शिंदे, आ.शिवाजीराव कर्डिले यांच्यापैकी कोण मंत्री होणार, याची चर्चा सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाला संधी देणार, हा विषय अनुत्तरित आहे. सेनेकडून आ.विठ्ठल लंघे समर्थकांनी मंत्रिपदाची अपेक्षा ठेवली आहे. तर राष्ट्रवादीकडून आ.आशुतोष काळे व आ.संग्राम जगताप यांच्यापैकी कोण मंत्री होणार, याबाबत समर्थकांमध्ये उत्सुकता आहे. मात्र त्या दिशेने ठोस हालचाली नसल्याने सारेच संभ्रमात आहेत. रविवारी दुपारपर्यंत याबाबत स्पष्टता येणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...