Wednesday, September 11, 2024
Homeमुख्य बातम्याCabinet Decision : कॅसिनो कायदा रद्द; गणेशोत्सव, दिवाळीमध्ये १०० रुपयात आनंदाचा शिधा......

Cabinet Decision : कॅसिनो कायदा रद्द; गणेशोत्सव, दिवाळीमध्ये १०० रुपयात आनंदाचा शिधा… मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

मुंबई | Mumbai

गौरी गणपती, दिवाळीसाठी राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार या शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर खाद्यतेल देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या (Maharashtra Cabinet Decision) बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

- Advertisement -

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबवणार आहे. पाच हजार कोटीचा प्रस्ताव (आदिवासी विकास विभाग)

गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा (अन्न व नागरी पुरवठा)

आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा ५०० रुपये मिळणार (कौशल्य विकास )

मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी (महसूल विभाग)

महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द (गृह विभाग )

केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम, राज्याचा हिस्सा वाढला (महिला व बाल विकास)

सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे (सहकार विभाग )

दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन

(विधी व न्याय विभाग )

मंडणगड येथे दिवाणी न्यायालय (विधी व न्याय विभाग)

- Advertisment -

ताज्या बातम्या