Monday, April 28, 2025
Homeजळगावआपल्या टिव्ही चॅनल्सची ही दरवाढ पाहीली का ?

आपल्या टिव्ही चॅनल्सची ही दरवाढ पाहीली का ?

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

विविध वाहिन्या चालविणार्‍या काही कंपन्यांनी दरवाढ (Cable price increase) केल्याने ग्राहकांना वाढीव दराचा आर्थिक झळ सोसावी लागण्याची शक्यता आहे. गेल्या पाच ते सहा दिवसापासून केबलवरील दरवाढ केलेले चॅनल्स कंपनीने कोणती ही पुर्वसुचना न देता चॅऩल्सचे प्रसारण बंद केले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख ग्राहकांना (customers) टीव्ही पाहण्यासाठी आता 30 टक्के जादा पैसे मोजावे (financial hit) लागण्याची शक्यता आहे. या दरवाढीबाबत केबलचालकांनी विरोध करून न्यायालयात धाव घेतली आहे.

- Advertisement -

भयानक : धुळ्यात तरूणाचा शिरच्छेदसव्वा लाखांची दारु नष्ट

देशात महागाईमुळे सर्वसामान्यांसह सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. त्यात आता आणखी भर पडले असून नागरिकांचे करमणुकीचे साधन असलेले टिव्ही पाहणे देखील आता महागण्याची शक्यता आहे. कारण विविध ब्रॉडक्साटर चॅनल्सच्या कंपन्यांनी दरवाढ केली आहे. या दरवाढीला केबलचालकांनी विरोध दर्शवीला असून याबाबत केबलचालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यात चॅनल्स कंपन्यांनी केबल पुरवठा पुर्वसुचना न देता चॅनलचे प्रसारण बंद केले आहे. त्यामुळे अचानक चॅनल्स बंद झाल्याने गृहिणींच्या आवडत्या सिरीयल पाहण्या बंद झाल्याने त्यांच्याकडून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

गंगापूर येथे धावत्या ट्रकला भिषण आगगुर्जर समाजाने केला हा आदर्श ठराव

केंद्र सरकारचे धोरण बेजबाबदार

केंद्र सरकारकडून मनोरंजन क्षेत्रात अर्थात ब्रॉडकास्ट बाबत 2018 मध्ये ग्राहक जेवढे चॅनल पाहिजे तेवढे पैसे लागेल असे धोरण ठरवले होते. परंतू चॅनल्स कंपन्नांनी दरवाढ वेळोवेळी केल्याने आधी नागरिकांना 200 रुपयात संपूर्ण चॅनल्स पाहण्यास मिळत होते ते आता 300 ते 350 रुपये झाले आहे. त्यात आता नविन दरवाढीमूळे ग्राहकांना थेट 450 रुपया पर्यंत पैसे टीव्हीवर विविध चॅनल्स पाहण्यासाठी मोजावे लागणार आहे.

पत्नीचा खून करणार्‍या पतीला जन्मठेप

टॅरीफ ऑर्डरनुसार किमंतीत वाढ

ट्रायच्या नवीन टॅरीफ ऑर्डरनुसार चॅनल्स आणि पॅकेजच्या किंमतीत ब्रॉडकास्टर कंपन्नांनी दरवाढ केली आहे. त्यामुळे देशातील सर्व आघाडीच्या एमएसओ म्हणजे केबल पुरवठा कंपन्यांनी वाढीवर दराला विरोध दर्शवीला आहे. केबल कनेक्शन बंद असलेले पुरवठादारांकडील देशात सुमारे 4 कोटी 5 लाख ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.

जुन्या धुळ्यात दोन गटात तुफान हाणामारीMakeup Part 5 : असा करा कियारा, कतरीना व आलिया सारखा नैसर्गिक मेकअप

जिल्ह्यात सुमारे अडीच लाख ग्राहक

जळगाव जिल्ह्यात सुमारे सात ते आठ केबल पुरवठा कंपन्यांकडून जळगाव शहरासर अन्य शहर व ग्रामीण भागातील खेड्यांमध्ये केबल सेवा पुरवली जाते. सुमारे 2 लाख 50 हजार ग्राहकांची संख्या असून या ब्रॉडकॉस्ट कंपन्यांनी केलेल्या नविन दरवाढीमूळे अडिच लाख ग्राहकांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

पत्नीचा खून करणार्‍या पतीला जन्मठेपMakeup Part 4 # असा करा Self makeup

पुर्वी ग्राहकांना दोनशे रुपयांमध्ये सर्व चॅनल्स पाहण्यास मिळत होते. परंतू ट्रॉयच्या धोरणानूसार तसेच चॅनल्स कंपन्यांनी केलेल्या दरवाढीमूळे ग्राहकांच्या अवाक्या बाहेर किंमत त्यांना मोजावी लागण्याची शक्यता आहे. याबाबत न्यायालयात लढा सूरु असून ग्राहकांमध्ये आम्ही जनजागृती करत आहे.

दिपक फालक, केबल वितरक

जुन्या धुळ्यात दोन गटात तुफान हाणामारी

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...