Sunday, July 7, 2024
Homeनगरअश्लिल चाळे सुरू असलेल्या कॅफेवर पोलिसांचे छापे

अश्लिल चाळे सुरू असलेल्या कॅफेवर पोलिसांचे छापे

तोफखाना पोलिसांची सावेडीत कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

शाळा-कॉलेजच्या मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार्‍या सावेडी उपनगरातील दोन कॅफेवर तोफखाना पोलिसांनी सोमवारी छापेमारी केली. कॅफे चालकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले असून तेथे अश्लिल चाळे करताना पकडलेल्या मुला-मुलींना समज देऊन सोडून देण्यात आले आहे. मनमाड रस्त्यावरील डौले हॉस्पिटलजवळ स्टेला कॅफेत शाळा- कॉलेजच्या मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती.

त्यांनी या ठिकाणी छापा टाकला असता कॅफेचा मालक अंजिक्य कोतकर (वय 20 रा. कोतकर मळा, केडगाव) हा मिळून आला. कॅफेच्या नावाखाली प्लायवुडचे कंम्पार्टमेंट करून, पडदे लावुन अंधार करून मुला- मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे समोर आले. कोतकरला ताब्यात घेऊन त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाड रस्त्यावरील बॉलिवुड कॅफेत मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याची माहितीही तोफखाना पोलिसांना मिळाली होती.

माहिती मिळताच त्यांनी छापा टाकला असता कॅफेचा मालक सुमित ठोंबे (वय 18 रा. अरणगाव) हा मिळून आला. त्याने कॅफेच्या नावाखाली प्लायवुडचे कंम्पार्टमेंट करून, पडदे लावुन अंधार करून मुला – मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे समोर आले. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुन्हा बस्तान
नगर शहरातील शाळा- कॉलेजच्या मुला- मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी कॅफेत जागा उपलब्ध करून त्यातून पैसा कमविण्याचा धंदा जोरात सुरू झाला होता. यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. शहर पोलिसांनी मध्यंतरी अशा कॅफेवर कारवाई देखील केली होती. मात्र, काही दिवस जाताच व शाळा-कॉलेज सुरू होताच या कॅफे चालकांनी आपले बस्तान पुन्हा बसविल्याचे समोर आले आहे. अशा कॅफेवर पोलिसांकडून कारवाई केली जावी, अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या