Saturday, May 4, 2024
Homeनाशिककरंजवण परिसरात बिबट्याने पाडला वासराचा फडशा

करंजवण परिसरात बिबट्याने पाडला वासराचा फडशा

ओझे l वार्ताहर Oze

दिंडोरी तालुक्याच्या (Dindori Taluka) कादवा नदी (Kadva River) परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याची (Leopard Attack) दहशत वाढली आहे. रात्री बारा वाजेच्या सुमारास करंजवण येथील कोंड वस्तीवरील अनिल कोंड (Anil Kond) याच्या दिड वर्षाच्या वासरावर बिबट्याने हल्ला (Leopard attack) केला. बिबट्यांने वॉल कंपाऊडमध्ये प्रवेश करून हल्ला करून वासराला जागेवरच फस्त केले…(calf death in leopard attack at karanjwan area)

- Advertisement -

बिबट्या (Leopard) येथे जवळ जवळ दिड ते दोन तास थांबल्याचे येथील रहिवासी सांगतात. बिबट्याने हल्ला केल्यानंतर वासरू जागेवर फस्त केलेले दिसून आले आहे. त्यामुळे वॉल कंपाऊड (Wall Compound) असतानादेखील बिबट्याने आत प्रवेश केल्यामुळे करंजवण (Karanjwan) परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कादवा नदी परिसरातील करंजवण (Karanjwan),ओझे,(Oze) म्हेळुस्के, (Mheluske) कादवा माळूगी (kadva mhalungi), नळवाडी, खेडले, लखमापूर परिसरामध्ये बिबट्याचा अनेक वर्षापासून वावर वाढला आहे.

यापुर्वी बिबट्याने लहान मुलावरही हल्ले केले असून आता बिबट्याने पाळीव प्राण्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. सध्या या परिसरातील गायी, म्हैशी कुत्रे, मांजरे, शेळ्या, मेंढ्या याच्यासह अनेक प्राण्यावर हल्ले करू बिबट्याने आपली भूख भागविली आहे.

कादवा नदी परिसरातील ज्या ज्या गावामध्ये जेथे जेथे बिबट्याचे वास्तव्य आहे. अशा ठिकाणी शेतमजूर सुद्धा कामासाठी येत नसल्यामुळे शेतकरी तेथे उसाची लागवड करताना दिसत आहे. त्या ओझे, करंजवण, लखमापूर, म्हेळुस्के, नळवाडी हा परिसर धरणाचा व नदीचा असल्यामुळे उसाचे क्षेत्र मोठ्याप्रमाणावर असल्यामुळे बिबट्याला पिण्यासाठी पाणी व लपण्यासाठी उसाच्या शेताची चांगली सोय झाल्यामुळे दिवसोदिवस या परिसरामध्ये बिबट्याची संख्या वाढताना दिसत आहे.

यासाठी तालुका वनविभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंजऱ्याची संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे.

नदी परिसरातील गावामध्ये सध्या बिबट्याची संख्या दिवसगणित वाढलेली आहे. वनविभागाने नुसते पंचनामे केले म्हणजे सर्व झाले असे न समजता घटना झालेल्या ठिकाणी वेळेत पिंजरा लावला गेला पाहिजे यांची दखल वनविभागाने घ्यावी.

अनिल कोंड, करंजवण

- Advertisment -

ताज्या बातम्या