Thursday, May 30, 2024
Homeमुख्य बातम्याबालविवाह प्रतिबंधक धडक मोहीम; एक महिन्यात रोखले १३ बालविवाह

बालविवाह प्रतिबंधक धडक मोहीम; एक महिन्यात रोखले १३ बालविवाह

नाशिक | प्रतिनिधी

महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या बालविवाह प्रतिबंधात्मक धडक मोहिमेअंतर्गत १ एप्रिल ते २ मे दरम्यान नाशिक जिल्ह्यात तब्बल १३ बालविवाह (child marriage) रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Ashima Mittal) यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांनी बालविवाह प्रतिबंधक विशेष मोहीम राबवत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली…

- Advertisement -

महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहीम पहिल्या टप्प्यात बालविवाह करू नये, बालविवाहाचे दुष्परिणाम, बालविवाह होणार असल्याचे कळाल्यास तक्रार कुठे करावी याबद्दल जनजागृती करण्यात आली.

मोठी बातमी! शरद पवारच राष्ट्रवादीचे ‘गॉडफादर’; राजीनाम्याचा निर्णय मागे

त्याचाच परिणाम म्हणून जिल्हा प्रशासनाकडे बालविवाहांसंदर्भात गोपनीय तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यानुषंगाने कारवाई करत महिला व बालकल्याण विभागाने जिल्ह्यात १३ बालविवाह रोखले असून, यामध्ये नाशिक तालुक्यातील १, सिन्नर १, बागलाण २, त्र्यंबकेश्वर ७, इगतपुरी २ असे बालविवाह रोखण्यात आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या कारवाईबद्दल सर्व सहभागी अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या