Friday, February 6, 2026
Homeजळगावमुक्ताईनगर मतदारसंघात ‘बोलो दिल से, चंदूभाऊ फिरसे..’चा उद्घोष!

मुक्ताईनगर मतदारसंघात ‘बोलो दिल से, चंदूभाऊ फिरसे..’चा उद्घोष!

मुक्ताईनगर। प्रतिनिधी

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी असून त्यांनी केलेल्या विकास कामांचा धडाका पाहता आमदार चंद्रकांत पाटील यांना पुन्हा मतदार संघातून निवडून देण्यासाठी ‘बोलो दिल से चंदूभाऊ फिरसे’ हा उद्घोष संपूर्ण मतदार संघात घुमत असून मतदार संघातील प्रत्येक गावात आमदार चंद्रकांत पाटील यांना गावकर्‍यांचा वाढता प्रतिसाद दिसून येत आहे.

- Advertisement -

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेले आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) , रि.पा.ई. (आठवले गट ) चे सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने रॅलीमध्ये सहभागी होऊन समाजातील प्रत्येक घटकाकडे पोहोचत आहेत.

YouTube video player

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कालावधीत अनेक विकास कामे केली व उर्वरित काही कामे बाकी आहेत. जनतेने पुन्हा सेवेची संधी दिल्यास उर्वरित राहिलेला विकास मार्गी लावण्यासाठी पुन्हा जनतेच्या दरबारात जात आहेत. या माध्यमातून मतदारसंघाचा व सर्वांचा विकास, हाच ध्यास आमदार चंद्रकांत पाटील यांचा असल्याचे ते आपल्या प्रचार सभांमधून मांडत आहेत. त्यांनी दि.13 नोव्हेंबर 2024 रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील पुरणाड, मेंढोदे (खडकाचे), दुई, कुर्‍हा, पिंप्राळा, काकोडा, हरताळा या गावांमध्ये प्रचार रॅली काढली.
याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गावकर्‍यांतर्फे गावागावात पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे व दिवसेंदिवस गावकर्‍यांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात पुन्हा आमदारकीची माळ पडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही व्यक्त केला जात असल्याने मतदारसंघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...