Wednesday, June 19, 2024
Homeदेश विदेशIndia vs Canada: कॅनडाकडून ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी केली

India vs Canada: कॅनडाकडून ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी केली

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

खलिस्तान टायगर फोर्सचा ( केटीएफ ) नेता हरदीप सिंग निज्जर (Hardip Singh Nijjar) याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडादरम्यान संबंधांमध्ये तणावर निर्माण झाला आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. अशातच कॅनड सरकारने पुन्हा एकदा भारताला डिचवले असून कॅनडातील नागरिकांसाठी एक ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी (Travel Advisory) ही जारी करण्यात आली आहे.

Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; जंगली प्राणी आडवा आल्याने भरधाव कार उलटली

कॅनडा सरकारने सांगितल्यानुसार, “जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेश असून सुरक्षेच्या दृष्टीने या राज्यात प्रवास करणे टाळावे . तिथे दहशतवाद, अशांतता आणि अपहरणाचा धोका असून यातून लडाख या केंद्र शासित प्रदेशाला वगळण्यात आले आहे.”

ICC ची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग रॅकेटचा पर्दाफाश; ३ भारतीयांसह ८ जण जाळ्यात

दोन्ही देशांमध्ये इॅकॉनॉमिक वॉर सुरु

दोन्ही देशांमधील संबंध बिघडायला सुरवात झाल्यामुळे राजकीय लढाईनंतर दोन्ही देशात आता इकोनॉमिक वॉर सुरु झालय. ज्याचा परिणाम कमोडिटीपासून एजुकेशन सेक्टरपर्यंत होणार आहे. खलिस्तान्यांचा समर्थन करण्यावरुन सुरु झालेला हा वाद आता इकोनॉमीपर्यंत जाऊन पोहोचलाय. भारत आणि कॅनडामध्ये कमोडिटीपासून एजुकेशन सेक्टरपर्यंत अनेक अब्जाची गुंतवणूक आहे. सर्वाधिक परिणाम एज्युकेशन सेक्टरवर होऊ शकतो.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या