Friday, June 20, 2025
Homeदेश विदेशभारताच्या झटक्यानंतर कॅनडाची नरमाईची भुमिका; भारतविरोधी बॅनर्स आणि पोस्टर्स हटवण्याचे आदेश

भारताच्या झटक्यानंतर कॅनडाची नरमाईची भुमिका; भारतविरोधी बॅनर्स आणि पोस्टर्स हटवण्याचे आदेश

नवी दिल्ली | New Delhi

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर हत्या (Khalistani Terrorist Hardip sing Nijjar Murder) प्रकरणी कॅनडाने आरोप केल्यानंतर भारताने सडेतोड उत्तर दिले. जशास तशी भूमिका भारताने घेतल्यामुळे आता कॅनडा मवाळ झाल्याचे दिसत असून खलिस्तानी फुटीरतावादी आणि दहशतवादी समर्थकांविरुद्ध भारताच्या दबावानंतर कॅनडा प्रशासनाने होर्डिंग आणि बॅनर हटवण्याचे (Removing Of Anti India Banners And Posters) आदेश दिले आहेत.

- Advertisement -

ब्रिटिश कोलंबिया प्रांतात महत्त्वाच्या ठिकाणी खलिस्तानी समर्थकांनी आपला प्रोपगंडा रेटण्यासाठी होर्डिंग, पोस्टर्स लावले होते. आता हे होर्डिंग आणि पोस्टर्स हटवले जात आहे. सरे मधील एका गुरुद्वारात भारतीय राजदूतांची हत्या करण्याचे आव्हान करणारी पोस्टर्स हटवली आहेत.

Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’मधील महत्वाचे मुद्दे

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी मुद्द्याचे गांभीर्य लक्षात घेत आणि कॅनडातून येणाऱ्या अशा संदेशांच्या शक्यतेची जाणीव झाल्यानंतर सरे गुरुद्वाराला तीन भारतीय राजदूतांच्या हत्येसाठी भडकावणारी पोस्टर्स हटवण्यास सांगितले होते. तसेच गुरुद्वारा व्यवस्थापनाला इशाराही देण्यात आला आहे की कोणत्याही कट्टरपंथीय घोषणेसाठी लाउडस्पीकरचा वापर करू नये अशा सुचना देण्यात आल्या आहे.

सरे हा ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील प्रमुख भाग असून या भागातल्या भारतविरोधी घोषणा आणि भावना भडकावणाऱ्या गोष्टी हटवल्या जात आहेत. यासोबतच कॅनडा-अमेरिका सीमावर्ती भागातील खलिस्तानी समर्थक संघटनांना ही अशी पोस्टर्स काढण्यासाठी सांगण्यात आलेय.

एनआयएने ‘या’ मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी जाहीर केली; मालमत्ता जप्त करणार

दरम्यान, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्या प्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर भारत कॅनडा यांच्यातील संबंधात कटुता निर्माण झाली असून भारताने कॅनडाच्या व्हिसा अर्जांना सस्पेंड केले असून दोन्ही देशांमधील प्रवास करणाऱ्यांसाठी ट्रॅव्हल अॅडव्हायजरी ही जारी करण्यात आली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दारणातूनही विसर्ग वाढला, गोदावरी दुथडी

0
राहाता | Rahata नाशिक जिल्ह्यात सह्यद्रीच्या घाटमाथ्यावर दोन दिवसांपासून संततधार सुरु असून दारणा धरण निम्मे भरल्याने या धरणातून विसर्ग सुरु झाला आहे. तर आज शुक्रवारी...