Thursday, January 8, 2026
Homeजळगावपाठिशी जनता मग कसली चिंता-दिलीप वाघ

पाठिशी जनता मग कसली चिंता-दिलीप वाघ

पाचोरा । प्रतिनिधी
पाचोरा भडगाव विधानसभेचे उमेदवार माजी आमदार तथा अपक्ष उमेदवार दिलीप वाघ यांना ग्रामीण भागातही उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे त्यांनी लोहारी, भोकरी व लासुरे या गावी जाऊन गृहभेटी घेऊन मतदारांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी प्रचारात लहान मुले शिट्ट्या वाजत पुढे चालत होती.

घरोघरी उमेदवार दिलीप वाघ यांचे औक्षण करून महिला भगिनींनी विजयासाठी शुभेच्छा देत होत्या व चाहते माजी आमदार दिलीप वाघ यांच्यावर प्रेम करणारी जीवाभाची माणसं प्रचारात स्वयपुर्तीने सहभागी झाल्याने दिलीप वाघ म्हणाले आता ‘माझ्या पाठीशी आहे जनता मग कसली चिंता’. मतदारसंघात त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आता आपला विजय निश्चित वाटतोय असे माजी आमदार दिलीप भाऊ म्हणाले. ग्रामीण भागात व शहरी भागात त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ जानेवारी २०२६ – शहाणे होण्याची गरज

0
जनतेला आता राजकारण्यांची, नेत्यांची कमाल वाटायला लागली असेल. चेहर्‍यावर सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे चढवायचे. तोच खरा चेहरा असल्याचे भासवायचे. गरज पडली तर मुखवट्याचे रंगही बदलायचे....