Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यसभेसाठी महाविकासआघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी दाखल केले अर्ज

राज्यसभेसाठी महाविकासआघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी दाखल केले अर्ज

मुंबई | Mumbai

राज्यसभेसाठी (Rajya Sabha) उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असून राज्यातून महायुतीच्या आणि महाविकासआघाडीच्या (Mahayuti and MahavikasAghadi) उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून यात महायुतीच्या पाच तर महाविकासआघाडीच्या एका उमेदवाराने (Candidate) विधानभवनात जाऊन अर्ज दाखल केला. तसेच भाजपने चौथा उमेदवार न दिल्याने आता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे…

- Advertisement -

भाजपने राज्यसभेसाठी कॉंग्रेसमधून (Congress) भाजपात आलेले अशोक चव्हाण, पुण्यातील कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कारसेवक डॉ.अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच शिंदेंच्या शिवसेनेने कॉंग्रेसमधून भाजपात आलेले मिलिंद देवरा आणि अजित पवार गटाने पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांना उमेदवारी दिली आहे. तर कॉंग्रेसकडून ज्येष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आज या उमेदवारांनी विधानभवनात (Vidhanbhavan) जाऊन पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले.

यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलतांना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “माझी टर्म (कार्यकाळ) चालू असताना मी परत अर्ज भरला आहे. त्याविषयीही लोक तर्कविर्तक लावत आहेत. मला एवढंच म्हणायचे आहे की, काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या. आम्ही पण राजकीय जीवनात काम करत असताना आम्हालाही काही ना काही घडामोडी कराव्या लागतात. त्यामुळे येणारा काळ स्पष्ट करेल, की आज मी फॉर्म का भरला. तसेच माझा राज्यसभेचा फॉर्म भरण्याचा आणि अपात्रतेच्या निकालाचा काहीही संबंध नाही, असेही पटेल यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या