Friday, November 15, 2024
Homeनगरपोलीस भरतीसाठी उमेदवारांना निवडावा लागणार एकच जिल्हा

पोलीस भरतीसाठी उमेदवारांना निवडावा लागणार एकच जिल्हा

नगर जिल्ह्यातील रहिवाशी तरूणांचे 1764 अर्ज; हमीपत्र भरून घेण्याची प्रक्रिया सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

पोलीस भरतीसाठी एका उमेदवाराने एकापेक्षा अधिक जिल्ह्यात वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला असल्यास त्यांना आता एकाच जिल्ह्याची निवड करावी लागणार आहे. त्यासाठी हमीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या तरूणांचे 1764 आवेदन अर्ज इतर वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी प्राप्त झाले आहे. त्यांच्याकडून हमीपत्र भरून घेण्याची प्रक्रिया नगर जिल्हा पोलीस दलाकडून येथील मुख्यालयाच्या मैदानावर बुधवारपासून (दि. 15) सुरू झाली आहे.

दरम्यान बुधवार व आज गुरूवार (दि. 16) हमीपत्र भरून देण्याची मुदत असून प्रशासनाकडून संबंधित उमेदवारांना मेलव्दारे माहिती देण्यात आली आहे. पोलीस भरतीतून या टप्प्यात राज्यातील 17 हजार 471 पदांसाठी तब्बल 17 लाख 76 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. नगर जिल्ह्यातील पोलीस शिपाई पदासाठी 25 तर चालक पोलीस शिपाई पदाच्या 39 जागा आहेत. पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई भरतीकरीता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवार एका पदाकरीता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो.

तशी तरतूद करण्यात आली होती, परंतू काही उमेदवारांनी एका पर्यायाकरीता एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एकच ग्राह्य धरून इतर घटकांतील आवेदन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी उमेदवारांकडून हमीपत्र भरून घेतले जात आहेत. ज्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीतील उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले आहेत, त्यांना याबाबत कळविण्यात आले आहे.

नगर जिल्ह्यातील अनेक तरूणांनी वेगवेगळ्या शहर- जिल्ह्यात भरतीसाठी अर्ज केले आहेत. उमेदवारांच्या सोयीसाठी नगर जिल्ह्यातील उमेदवारांनी हमीपत्र देण्यासाठी येथील मुख्यालयाच्या मैदानात उपस्थित राहण्याबाबत कळविले आहे. 1764 अर्ज असून अर्ज करणार्‍या संबंधीत तरूणांना मेल करण्यात आला आहे. हमीपत्र स्व-हस्तक्षरात भरून द्यावे लागणार आहे. आज गुरूवार (दि. 16) पर्यंत हमीपत्र भरून घेतल्यानंतर त्याचा अहवाल अप्पर पोलीस महासंचालकांना (प्रशिक्षण व खास पथके) उद्या शुक्रवार (दि. 17) पाठविला जाणार आहे.

नगर जिल्ह्यात राहणार्‍या ज्या उमेदवारांनी एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त जिल्ह्यात अर्ज केले आहेत. अशा उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी एकाच जिल्ह्याची निवड करून तसे हमीपत्र प्रत्यक्ष हजर राहून द्यायचे आहे. या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) यांच्या कार्यालयाकडून किंवा नगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून ज्या उमेदवारांना मेसेज पाठविले आहेत किंवा मेसेज आले नाहीत पण अर्ज केला आहे, अशा सर्व उमेदवारांनी 15 व 16 मे रोजी नगर पोलीस मुख्यालयात उपस्थित राहायचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या