Saturday, November 9, 2024
HomeधुळेLoksabha Election 2024 : उत्तर महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघातील वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद

Loksabha Election 2024 : उत्तर महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघातील वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद

नाशिक | Nashik

राज्यातील महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aaghadi) जागावाटपात सन्मानजनक जागा न मिळाल्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेल्या वंचितला उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) धुळे लोकसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघातील वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननी अंती बाद झाला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात तिहेरी ऐवजी दुहेरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

धुळे लोकसभा मतदारसंघातून (Dhule Loksabha) महायुतीने भाजपच्या डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamare) यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या डॉ. शोभा बच्छाव (Dr. Shobha Bachhav) यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aagahdi) धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलेले सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांना उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांचा उमेदवारी अर्ज छाननी अंती बाद झाला आहे.

हे देखील वाचा : ठाकरे गटाने उमेदवारी नाकारलेले विजय करंजकर आहेत ‘एवढ्या’ कोटींचे मालक

दरम्यान, शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होण्याचा न्यायप्रविष्ठ निर्णय पूर्ण न झाल्याने निवडणूक आयोगाने अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद (Nominations Rejected) ठरवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यावर बोलताना रहमान म्हणाले की, निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात (High Court) जाणार असून तिथे मला न्याय मिळेल, असा विश्वास आहे, असे त्यांनी म्हटले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या