Monday, September 28, 2026
Homeक्राईमAhilyanagar : गांजा कारवाईतील तक्रारीनंतर चार अंमलदारांच्या बदल्या

Ahilyanagar : गांजा कारवाईतील तक्रारीनंतर चार अंमलदारांच्या बदल्या

उपनिरीक्षकही बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त || चौकशी सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

कोतवाली पोलिसांनी केलेल्या कथित गांजा कारवाईतील कागदपत्रे, स्टेशन डायरीतील नोंदी आणि सीसीटीव्ही फुटेजमधील घटनाक्रमात विसंगती असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीदरम्यान चौकशी प्रक्रियेवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यातील चार पोलीस अंमलदारांच्या अन्य पोलीस ठाण्यांत तात्पुरत्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी तातडीने कार्यमुक्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

पोलीस अंमलदार रोहिणी दरंदले आणि पल्लवी रोहकले यांची भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात, दीपक रोहकले यांची बेलवंडी पोलीस ठाण्यात, तर अतुल काजळे यांची सुपा पोलीस ठाण्यात तात्पुरती बदली करण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांनी पुढील आदेशापर्यंत संबंधित पोलीस ठाण्यांत कामकाज पाहावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांची यापूर्वीच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली होती. मात्र, त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आले नसल्याने आता त्यांना बदलीच्या ठिकाणी तातडीने कार्यमुक्त करण्यात आले आहे.

यासंदर्भातील आदेश कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी काढले आहेत. दरम्यान, कोतवाली पोलिसांनी 10 जुलै 2026 रोजी केलेल्या कथित एनडीपीएस कारवाईबाबत शाकीर शेख यांनी तक्रार केली होती. चौकशी सुरू असताना संबंधित पोलीस अंमलदार त्याच पोलीस ठाण्यात कार्यरत राहिल्यास चौकशी प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या तात्पुरत्या बदल्या करण्यात आल्याचे आदेशावरून स्पष्ट होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळामुळे जिल्हा बँकेची आर्थिक कोंडी आणखी वाढणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कर्जमाफीच्या घोषणेमुळे गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या अर्थकारणावर यंदाच्या दुष्काळाचेही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्य...