Wednesday, July 3, 2024
Homeनंदुरबारमोदलपाडा येथे ऊसाच्या शेतात आढळली गांजाची झाडे

मोदलपाडा येथे ऊसाच्या शेतात आढळली गांजाची झाडे

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

- Advertisement -

मोदलपाडा (ता.तळोदा) येथील ऊसाच्या शेतात ८७ हजार ८२५ रुपये किमतीची गांजाची १६ झाडे आढळून आली. याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, तळोदा तालुक्यातील रामपूर गावाजवळ सतोना गाव शिवारात रेसा नदर्‍या पाडवी याने त्याच्या ऊसाच्या शेतात बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती स्थाानिक गुन्हा अन्वेषाणा शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाली होती.

त्यानुसार रविंद्र कळमकर, तळोदा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अविनाश केदार व पथकाने सतोना गावात सापळा रचला. तेथे ६ ते ७ फुट उंचीचे ऊसाचे पिक व एका शेतात एक इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आले.

रेसा नदर्‍या पाडवी रा.रामपूर पो.मोदलपाडा ता.तळोदा असे त्या इसमाचे नाव होते. रेसा पाडवी याच्या ऊसाच्या पिकाची पाहणी केली असता शेताच्या आतील बाजुस ठिकठिकाणी ५ ते ६ फुट उंचीचे हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसून आले.

म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संपुर्ण दीड एकर शेती पिंजुन काढली असता तेथे ८७ हजार ८२५ रुपये किंमतीची एकुण १६ गांजाची झाडे मिळून आली. संशयीत रेसा नदर्‍या पाडवी व त्याच्या शेतात मिळून आलेली गांजाची झाडे पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.

रेसा नदर्‍या पाडवी याने त्याच्या मालकीच्या शेतात ऊसाच्या पिकामध्ये बेकायदेशीररीत्या गांजाच्या झाडांची लागवड केली म्हणून त्याच्याविरुध्द् गुंगीकारक औषध द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-१९८५ अन्वये तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या