Friday, October 2, 2026
HomeनगरShrirampur : कारच्या डिक्कीत 4 किलो गांजा; दोघा अल्पवयीनांसह तिघांवर कारवाई

Shrirampur : कारच्या डिक्कीत 4 किलो गांजा; दोघा अल्पवयीनांसह तिघांवर कारवाई

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी चार किलो गांजा (Cannabis) व गांजा वाहतुकीसाठी वापरलेली किया सोनेट कार असा एकूण 5 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला. या कारवाईत एका 30 वर्षीय तरुणासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर शहरातील जर्मन हॉस्पिटलच्या पाठीमागे, पाण्याच्या पाटाच्या पलीकडे उपाध्ये मळा परिसरात एका चारचाकी वाहनातून गांजाची (Cannabis) विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा (Police Raid) टाकला. यावेळी रस्त्याच्या कडेला तीन इसम व पांढर्‍या रंगाची किया सोनेट कार आढळून आली. वाहनाची पंचांसमक्ष झडती घेतली असता डिक्कीत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये 4 किलो हिरवट रंगाचा गांजा, अंदाजे 60 हजार रुपये किमतीचा, आढळून आला. तसेच सुमारे 5 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 5 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur Police Station) एनडीपीएस कायदा 1985 मधील कलम 8(क), 20(ब)ळळ(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये मयुर राजेंद्र वाघ (वय 30, रा. निपाणी निमगाव, ता. नेवासा) याच्यासह श्रीरामपूर येथील दोन अल्पवयीनांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल खैरे, पोउपनि आप्पासाहेब हंडाळ व पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....