Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमPathardi : परराज्यातून गांजा विक्रीसाठी आणणारे गजाआड

Pathardi : परराज्यातून गांजा विक्रीसाठी आणणारे गजाआड

27.41 लाखांचा मुद्देमाल जप्त

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी पोलिसांनी मंगळवारी धडकेबाज कारवाई करत परराज्यातून गांजा विक्रीसाठी आलेल्या टोळीतील दोन आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्याकडून तब्बल 27 लाख 41 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तालुक्यात अंमली पदार्थ विक्री करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी (दि. 6) पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. परराज्यातील दोन आरोपी पांढरी पूल ते पाथर्डी रस्त्याने बोलेरो पिकअप वाहनातून गांजा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी तात्काळ पथक तयार केले.
मिरी शिवारात सापळा रचून मंगळवारी सकाळी 10 वाजता संशयित बोलेरो पिकअप अडवण्यात आली. वाहनाची झडती घेतली असता सात गोण्यांत भरलेला 60.04 किलो वजनाचा गांजा आढळून आला. वाहनचालक तुलसीदास दर्गादास खरगे (वय 25) व त्याचा साथीदार दिनेश सिलदार सोलंकी (वय 24, दोघे रा. गोई, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.

YouTube video player

या कारवाईत पोलिसांनी 20 लाख 41 हजार 200 रुपये किमतीचा 60.04 किलो गांजा, 7 लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप गाडी, असा एकूण 27 लाख 41 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, संदिप ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बडे, संभाजी कुसळकर, इजाज सय्यद, कानिफनाथ गोफने, म्हस्के, संजय जाधव, ज्ञानेश्वर इलग, सागर बुधवंत, भगवान टकले, अक्षय लबडे यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Nashik Crime : पोलीस चौकीवर दगडफेक करणारे अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पोलीस चौकीवर (Police Chowki) दगड फेक करून फरार झालेल्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सीसीसीटीव्हीच्या...