वैजापुर |प्रतिनिधी| Vaijapur
शिऊर पोलिसांनी (Shiur Police) अवैधरित्या शिऊर शिवारात गट क्रमांक 126 मध्ये गांजाच्या झाडांची (Cannabis Trees) शेती करणार्या टूनकि येथील रहिवासी असलेल्या एकावर कारवाई करत एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.या कारवाई मध्ये पोलिसांनी तब्बल 30 किलो 110 ग्रॅम वजन असलेला दोन लाख 40 हजार 880 रुपये किमतीचा गांजाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यावर वैजापूरमध्ये सट्टा, पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार शिऊर शिवारात गांजाची (Cannabis) शेती सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने परिसरातील गट क्रमांक 126 मध्ये पोलिसांनी छापा (Police Raid) टाकला असता त्यांना त्या ठिकाणी गांजा सदृश्य झाडे लावून शेती सुरू असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणात पोलिसांनी विष्णू मनसुख शिंदे (वय 45, रा- टूनकी) या संशयीताला गांजा (Cannabis) सदृश्य झाड लावून शेती करताना मिळून आल्याने एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक (Arrested) केली आहे.
जमिनीच्या वादातून झाडांची कत्तल; महिलेचा विनयभंगआगीत दोन कार्यालये जळून खाक
शिऊर पोलिसांत या प्रकरणात गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक पवार, ए.एस.आय. जाधव, पोलीस हवालदार गायकवाड, किशोर आघाडे, जाधव, पैठणकर, शेळके, आंधळे, कमवतकर व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे जोनवाल यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शिऊर पोलीस करीत आहे.
कलेक्टर कचेरीत आता कागदी टपालाला नो-एन्ट्री