पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
पाथर्डी-शेवगाव (Pathardi Shevgav Highway) राज्य मार्गावर डांगेवाडी शिवारात शुक्रवारी (दि.12) सायंकाळी कारची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात (Car Accident) आई व मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Mother and Son Death) झाला. सुनिता नवनाथ आव्हाड (वय 31) व त्यांचा मुलगा जयेश नवनाथ आव्हाड अशी मृतांची नावे आहेत. तर अन्य तीन जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाथर्डी-शेवगाव रोडवरील आव्हाड वस्ती येथे वास्तव्यास असलेले हे कुटुंब पाथर्डी (Pathardi) येथून घरी जात असताना सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास फोर्ड इकोस्पोर्ट व स्विफ्ट कार यांच्यात डांगेवाडी शिवारात समोरासमोर जोरदार धडक (Car Hit) झाली. धडक इतकी भीषण होती की फोर्ड इकोस्पोर्ट कारमध्ये प्रवासी अडकून पडले.
अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन दराडे, भगवान गरगडे, सुखदेव धोत्रे, सचिन गणगे, संदीप नागरगोजे, बाबासाहेब बडे, अमोल जवरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने अपघातग्रस्त गाडीचा दरवाजा रस्सीने बांधून एका बाजूला झाडाला गाडी बांधण्यात आली, तर दुसर्या बाजूने ट्रॅक्टरला दोर लावून दरवाजा उघडण्यात आला. त्यानंतर सुनिता आव्हाड व इतर जखमींना बाहेर काढण्यात आले.
उपचारापूर्वीच सुनिता आव्हाड व त्यांचा मुलगा जयेश यांचा मृत्यू (Death) झाल्याचे अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघातात (Accident) जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातातील जखमींना रुग्णालयात सोडून परत येत असताना तालुक्यातील मानमोडी परिसरात अॅम्बुलन्सचा किरकोळ अपघात झाला.




