Wednesday, March 26, 2025
Homeनगरटायर फुटल्याने कारला अपघात

टायर फुटल्याने कारला अपघात

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील (Newasa) पाचेगाव (Pachegav) येथील अमोल शिवाजी कांबळे हे शेतकरी गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास आपल्या स्वतच्या हुंडाई कंपनीची गाडीतून (एमएच 12 केई 7083) मिरची विकण्यासाठी श्रीरामपूर मार्केट कमिटी (Shrirampur Market Committee) येथे जात असताना पाचेगाव (Pachegav) फाट्यावरून श्रीरामपूर कडे साधारण एक किलोमीटर अंतरावर समोरून श्रीरामपूर कडून भरधाव वेगाने येणार्‍या गाडीच्या तीव्र प्रकाशाने पुढे काही न दिसल्यामुळे तसेच पुढील टायर अचानक फुटल्याने गाडीने शेजारच्या शेतात महावितरणच्या विजेच्या खांबाला धडक (Hit) देत आंब्याच्या झाडावर आदळली.

- Advertisement -

गाडी उलटल्यामुळे सर्व दरवाजे लॉक झाले, पण मागील डिकीतून शेतकर्‍याला बाहेर काढण्यात बाकीच्या मदत करणार्‍या नागरिकांना यश आले. त्यात गाडीचे पूर्णपणे नुकसान झाले. सुदैवाने शेतकर्‍यांला जास्त मार लागला नसला तरी पाय फ्रॅक्चर झाला असून पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News: नाशिकरोड पोलिसांची चाळीस रिक्षांवर दंडात्मक कारवाई

0
नाशिकरोड | प्रतिनिधीनाशिकरोड पोलिसांनी रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उचलला असून सुमारे ४० रिक्षा चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त...