Tuesday, June 16, 2026
Homeजळगावदेवी दर्शना आधीच निजामपूरच्या देवी भक्तांवर काळाचा घाला

देवी दर्शना आधीच निजामपूरच्या देवी भक्तांवर काळाचा घाला

जळगाव – jalgaon
नवरात्रोत्सवा निमित्त धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वाणी कुटूंब आज यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी मनुदेवी दर्शनासाठी जात असताना त्यांच्या भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार तर कारचालक गंभीर जखमी झाला आहे.

निजामपूर येथील वाणी कुटूंब दरवर्षी प्रमाणे आज मनुदेवी दर्शनासाठी जात होते. मात्र त्यांचेवर काळाने घाला घातला. यात वाणी कुटूंबातील शैलेश श्रीधर वाणी (वय ३४), निलेश श्रीधर वाणी (वय ३०), सोबत असलेले जितेंद्र मुरलीधर भोकरे (वय ४७) अपघातात ठार झाले तर कार चालक गंभीर जखमी झाला असून त्याचेवर चोपडा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मंदिर काही अंतरावर असतांनाच अचानक कारचा टायर फुटल्याने ते समोरून येणाऱ्या एसटी बस वर जाऊन धडकले या भीषण आणि  दुदैवी अपघातात निजामपूरचे वाणी बंधू व गुढे येथील जितेंद्र भोकरे या तिघांचा जागीच मृत्यू झाला व कारचालक गंभीर जखमी झाला.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : लाचलुचपत विभागाचे बनावट अधिकारी गजाआड! आलिशान गाडीसह...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सरकारी कार्यालयात रुबाब दाखवून आणि आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti-Corruption Bureau) बडे अधिकारी असल्याचे भासवून दिशाभूल करणाऱ्या एका हायप्रोफाइल टोळीचा...