Monday, May 19, 2025
HomeनगरAccident News : शिवसेनेचे संपर्क प्रमुख सातपुते यांच्या कारचा अपघात; एकाचा मृत्यू

Accident News : शिवसेनेचे संपर्क प्रमुख सातपुते यांच्या कारचा अपघात; एकाचा मृत्यू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप सातपुते यांच्या चारचाकी वाहनाचा शनिवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथे कार पुलावरून खाली कोसळली. यात कार पलटी झाली असून कारमधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर कारचालक जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

तलाठी महेंद्र मालन काळे (वय 40, रा. भूषणनगर, केडगाव) असे मयताचे नाव आहे. तर चालक भाऊ कांडेकर हे जखमी झाले आहेत. सातपुते व त्यांचे चार सहकारी शनिवारी बीड येथे लग्नासाठी गेले होते. तेथून परतताना रात्री बाराच्या सुमारास सारोळा बद्दी येथे त्यांची कार अचानक छोट्या पुलावरून खाली कोसळली. यात कार पलटी झाल्याने कारमधील तलाठी काळे यांचा मृत्यू झाला. तर कांडेकर हे जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आव्हाड करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : दोन तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी धारदार शस्त्र व लाथाबुक्क्यांनी हल्ला करत शिवीगाळ व दमदाटी केली. यामध्ये दोन तरूण जखमी झाले आहेत....