सोनई |वार्ताहर| Sonai
मढी (Madhi) (ता. पाथर्डी) येथे दर्शनासाठी आलेल्या सिन्नर (Sinnar) तालुक्यातही कासारवाडी येथील भाविकांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट मुळा पाटबंधारे विभागाच्या कालव्यात (Mula Canal) कोसळून, तीन ठार जण ठार झाले असून एक बचावला असल्याची माहीती आहे. घोडेगाव-सोनई रस्त्यावरील शनेश्वर दूध संघाजवळ असलेल्या कालव्याच्या पुलावर बुधवारी सायंकाळी ही भीषण दुर्घटना घडली. कालव्यात पाणी सुरू असल्याने कारमधील तिघांचा मृत्यू (Death) झाला, तर एकजण सुदैवाने बचावला. कार (क्र. एमएच 03 बीडब्लू 7884) मढी येथे दर्शनासाठी जात असताना, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार पुलावरून (Car Accident) थेट कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत रणधीर भाऊसाहेब, केरू जगताप आणि सुभाष बिडवे यांचा मृत्यू झाला. तर संदीप सदाशिव कदम हा या अपघातातून बचावला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत, मदतकार्य सुरू केले. सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव, सहायक फौजदार मच्छिंद्र आडकित्ते, पो. कॉ सुनील पालवे, वजीर शेख यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. क्रेनच्या साहाय्याने कालव्यातील कार बाहेर काढण्यात आली. मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा येथे पाठविण्यात आले होते. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.




