Thursday, January 8, 2026
Homeनगरभरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार, एक जखमी

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार, एक जखमी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील आगसखांड फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी भरधाव कारने दिलेल्या धडकेमुळे दुचाकीवरील वडिल जागीच ठार तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. रोहिदास माधव वनवे (52 )असे ठार झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर मुलगा अविनाश रोहिदास वनवे (24, खडकवाडी ता. आष्टी जि. बीड) हा गंभीर जखमी झाल्याने त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहिदास वनवे व मोठा मुलगा अविनाश वनवे हे बापलेक दुचाकीवरून पाथर्डी तालुक्यातील अकोले गावच्या रस्त्यावरून आगसखांड गावाकडे राष्ट्रीय महामार्ग कल्याण-निर्मल (विशाखापट्टणम) हा ओलांडत असताना राष्ट्रीय महामार्गावरून खरवंडी कासारकडून भरधाव वेगाने धावणारी चार चाकी इनोव्हा गाडीने वनवे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.त्यामध्ये रोहिदास वनवे यांचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश वनवे गंभीर जखमी झाले.

YouTube video player

मयत रोहिदास वनवे यांचा लहाना मुलगा अशोक रोहिदास वनवे (वय 22) हा सोमवारी अपघात होण्यापूर्वी बारामती अ‍ॅग्रो या कारखान्याहून आपल्या खडकवाडी मूळ गावी येत असताना त्याचाही रस्त्यामध्ये अपघात झाला. त्यात अशोकच्या पायाला गंभीर मार लागल्याने खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या