Tuesday, March 25, 2025
HomeनगरAccident News : कार-दुचाकीच्या धडकेत एक ठार

Accident News : कार-दुचाकीच्या धडकेत एक ठार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

पुणे-नाशिक महामार्गालगत (Pune Nashik Highway) असलेल्या संगमनेर (Sangamner) शहराजवळील कृष्णा लॉन्सजवळ एका भरधाव वेगातील कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत (Car and Bike Accident) एक ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.21) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे.

- Advertisement -

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की चिकणी येथील शुभम सुदाम वर्पे (वय 22) हा आपले वडील सुदाम देवराम वर्पे (वय 48) यांच्यासह दुचाकीवरुन (क्र.एमएच.17, एएम.9879) नाशिकच्या (Nashik) दिशेने जात असताना कृष्णा लॉन्सजवळ आले असता कारचालक मुकेश दिनकर बहिरट याने भरधाव वेगातील कारने (क्र.एमएच.12, एनयू.0497) त्यांना पाठीमागून जोराची धडक (Hit) दिली. यावेळी सुदाम वर्पे हे दुचाकीवरुन उडून ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरखाली सापडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला.

अपघातानंतर (Accident) पोलिसांना खबर न देता कारचालक पळून गेला. याप्रकरणी शुभम वर्पे याने दिलेल्या फिर्यादीवरुन कारचालक मुकेश बहिरट याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील हे करत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...