Saturday, October 3, 2026
Homeक्राईमकार मधून 500 किलो गोमांस जप्त

कार मधून 500 किलो गोमांस जप्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस घेऊन जाणार्‍या कारने टेम्पोला धडक दिली. यामुळे नगर तालुका पोलिसांनी 50 हजार रुपये किमतीचे 500 किलो गोमांस व दोन लाखांची कार असा दोन लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नगर- पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात आस्वाद मिसळ हॉटेल समोर रविवारी (15 सप्टेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

- Advertisement -

याप्रकरणी पोलीस अंमलदार आदिनाथ शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निहाल इक्बाल बागवान (वय 25 रा. पंचपीर चावडी, नगर) याच्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागवान हा रविवारी दुपारी त्याच्याकडील कार (एमएच 48 पी 9391) मधून गोवंशीय जनावराचे 500 किलो मांस घेऊन जात होता. त्याने चास शिवारात आस्वाद मिसळ हॉटेलसमोर रस्त्यात बंद स्थितीत उभ्या असलेल्या एका टेम्पोला (एमएच 14 एफयू 2195) पाठीमागून धडक दिली.

या अपघातात कार चालक बागवान जखमी झाला. या अपघाताची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कारची तपासणी केली असता त्यामध्ये 500 किलो गोमांस मिळून आले. पोलिसांनी पंचासमक्ष कार व त्यातील मांस जप्त केले आहे. बागवान विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार डावखर करत आहेत.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...