Wednesday, January 7, 2026
HomeनगरAccident News : कारची मोटारसायकलला धडक; पती पत्नी जखमी

Accident News : कारची मोटारसायकलला धडक; पती पत्नी जखमी

श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावरील घटना

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा-श्रीरामपूर राज्यमार्गावर (Newasa Shrirampur Highway) आज (1 मे) रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान पाचेगाव फाटा (Pachegav Phata) लगत असणार्‍या अजिंठा हॉटेलच्या समोर चार चाकी वाहनांने समोर चाललेल्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक (Hit) दिली. त्यात मोटारसायकल वरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना नेवासा फाटा (Newasa Phata) येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

सविस्तर माहिती अशी की, नागफणी ता. नेवासा येथील जयदीप कारभारी ठाणगे (वय 45) व त्यांची पत्नी मोहिनी जयदीप ठाणगे हे श्रीरामपूर येथील उंदिरगाव येथील आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधी आटोपून घरी येत असताना लोखंडी फॉल जवळील अजिंठा हॉटेलच्या समोर त्यांच्या मोटारसायकलला श्रीरामपूरकडून (Shrirampur) नेवाश्याकडे जाणार्‍या एम एच 17-सी एक्स 4580 या चारचाकी वाहनांने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात मोटारसायकलस्वार पती व पत्नी गंभीर जखमी झाले आहे. त्यांना नेवासा फाटा येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

YouTube video player

ठाणगे यांच्या मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे. चारचाकी गाडीवर महाराष्ट्र शासनाचा फलक लावलेला आहे. चारचाकी वाहन हे श्रीरामपूरच्या आसपासचे असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्यापर्यंत नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) कोणत्याही प्रकारचा गुन्हा दखल झालेला नाही.

ताज्या बातम्या

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा- राज्य निवडणूक आयुक्तांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच...