Saturday, May 25, 2024
Homeदेश विदेशभीषण अपघात! भरधाव कारची सहा गाड्यांना धडक; तिघांचा मृत्यू, सात गंभीर

भीषण अपघात! भरधाव कारची सहा गाड्यांना धडक; तिघांचा मृत्यू, सात गंभीर

पणजी | Panji

गोव्याच्या (Goa) फोंडा-पणजी महामार्गावर (Fonda-Goa Highway) एका भरधाव मर्सिडिजने सहा गाड्यांना उडवल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात (Accident) तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे…

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, फोंडा-पणजी (Fonda- Goa Highway Accident) महामार्गावर बाणस्तारी पुलाजवळ भीषण अपघात झाला. फोंड्याकडून गोव्याकडे जाणाऱ्या भरधाव मर्सिडिज कारने तीन चारचाकी गाड्या आणि तीन दुचाकींना उडवले.

दिल्लीतील एम्स रुग्णालयात भीषण आग! घटनास्थळी आठ अग्निशमनदलाच्या गाड्या दाखल

या अपघातात तीन दुचाकीस्वार जागीच ठार झाले. सुरेश फडते, भावना फडते आणि अनुप कर्माकर अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. तसेच अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना बांबोळी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मर्सिडिज कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परेश ए. सिनाई सावर्डेकर असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

बावनकुळेजी, गप्पा काय झोडता? महापालिकेच्या लांबलेल्या निवडणूका लावा; अंबादास दानवेंचा पलटवार

- Advertisment -

ताज्या बातम्या