संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील सायखिंडी फाटा येथे नव्यानेच झालेल्या डी-मार्टच्या वाहनतळावर उभ्या केलेल्या कारमधून खिडकीची काच फोडून (Car Glass Breaking) अज्ञात चोरट्याने छायाचित्रकाराची 4 लाख 17 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल असलेली पिशवी चोरुन (Theft) नेल्याची घटना रविवारी (दि.6) रात्री सात ते साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की घुलेवाडी येथील यश वसंत राऊत (वय 22) यांनी सायखिंडी फाट्यावरील डी-मार्टच्या वाहनतळावर आपली कार उभी केली होती. त्यावेळी कारमध्ये 1 लाख 40 हजार रुपयांचा कॅमेरा, 45 हजार 200 रुपयांच्या लेन्स, 14 हजार 200 रुपयांचे मेमरी कार्ड, 9 हजार रुपयांची बॅटरी, 31 हजार रुपयांच्या लेन्स, 80 हजार रुपयांचा लॅपटॉप, 19 हजार रुपयांचा गिंबल, 40 हजार रुपये किमतीच्या लेन्स, 27 हजार 300 रुपयांचे कार्ड रिडर व इतर साहित्य आणि 12 हजार रुपयांचा वायरलेस माईक असा एकूण 4 लाख 17 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने संधी साधत कारची खिडकी फोडून लांबवला आहे. याप्रकरणी यश राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभंग हे करत आहे.