Saturday, March 29, 2025
Homeनंदुरबारशहादा येथे कार झाडावर आदळली ; दोन ठार

शहादा येथे कार झाडावर आदळली ; दोन ठार

शहादा । ता. प्र. Shahada

शहादा-डोंगरगाव रस्त्यावरील महावीर इंग्लिश मीडियम स्कूलसमोर चार चाकीचा अपघात झाल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. किया सेलटॉस गाडी (क्रमांक एम एच 15 एच जी 9801) डोंगरगावकडून शहादाकडे येत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी झाडावर आदळली.

- Advertisement -

यात विजय श्रावण सोनवणे (वय 23, रा.डोंगरगाव) व अमरसिंग धनसिंग गिरासे उर्फ सनी (वय 28, रा. लोणखेडा) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की गाडीच्या एअर बॅग उघडूनही त्यातील व्यक्ती वाचू शकले नाही. घटना कळताच डोंगरगाव व लोणखेडा येथील तरुणांनी धाव घेत मदत कार्य केले. सकाळपासून पाऊस चालू असल्याकारणाने मदत कार्यातही अडथळा निर्माण होत होता. मृत दोघा व्यक्तींना शहादा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार, शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, त्यांच्या टीमने भेट देऊन पुढील कार्यवाही केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...