Friday, May 31, 2024
Homeनगरपावणे दोन लाखांची रक्कम पळवली

पावणे दोन लाखांची रक्कम पळवली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बँकेसमोर उभ्या असलेल्या कारमधून एक लाख 82 हजार रूपयांची रक्कम पळवली. एमआयडीसीतील बँक ऑफ बडोदाच्या शाखेसमोर बुधवारी (दि. 9) दुपारी सव्वा तीन वाजता ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शशिकांत गजानन वांढेकर (वय 34 रा. शेंडी बायपास रस्ता, वडगाव गुप्ता, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. वांढेकर यांनी बुधवारी दुपारी सव्वा तीन वाजता एमआयडीसीतील बँक ऑफ बडोदाच्या शाखेसमोर त्यांची कार (एमएच 5 बीएस 4397) पार्क केली होती. त्या कारमध्ये एक लाख 82 हजार रुपयांची रक्कम होती. चोरट्यांनी कारमधील रक्कम असलेली पिशवी पळवून नेली. वांढेकर यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरटे पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक योगेश चाहेर करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या