Monday, May 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमालवाहू वाहनाची दोन मुलींना धडक; एका मुलीचा मृत्यू, एक गंभीर जखमी

मालवाहू वाहनाची दोन मुलींना धडक; एका मुलीचा मृत्यू, एक गंभीर जखमी

- Advertisement -

निफाड । प्रतिनिधी Niphad

निफाड-उगाव मार्गावरील बेघर वस्तीवर शनिवार (दि.12) दसर्‍याच्या दिवशी मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेत एका नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर एक वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याने परिसरात शोककळा पसरली.

याबाबत निफाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निफाड येथील निफाड-उगाव दरम्यान बेघर वस्तीवरील दीपक बाबू पवार यांची मुलगी रेणूका पवार वय (9) व लक्ष्मी माळी वय (10) या दोन्ही मुली दसरा सणाच्या निमित्ताने उगाव मार्गावरील विनता नदीवरील वसंत बंधार्‍यावरून रस्त्याने निफाडकडे पायी होत्या.

यावेळी निफाडकडून उगावकडे भरधाव वेगाने जाणार्‍या मालवाहू वाहन चालकाने निष्काळजीपणे कुठलीही चूक नसलेल्या या दोन्ही चिमुरड्यांना समोरून जोरदार धडक देऊन वाहनासह चालक पसार झाला. या जोरदार धडकेत रेणूका पवार हिच्या तोंडाला व डोक्याला गंभीर जखम झाल्याने तिचा मृत्यू झाला. तर लक्ष्मी माळी हिला गंभीर दुखापत होऊन तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

याबाबत निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गुरव, पो. हवा. भास्कर पवार अधिक तपास करत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : तीन गोवंशांची सुटका; एकास अटक, युनिट एकची कारवाई

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik संगमनेर येथे गोवंशीय जनावरांना (Animals) कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या पिकअपला नाशिकरोड परिसरात (Nashik Road Area) अडविण्यात येऊन तीन गोवंशीय जनावरांची सुटका...