Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमगुलमोहर विश्रामगृहातील रोकड प्रकरण; स्वीय सहाय्यक किशोर पाटीलसह तिघांवर गुन्हा

गुलमोहर विश्रामगृहातील रोकड प्रकरण; स्वीय सहाय्यक किशोर पाटीलसह तिघांवर गुन्हा

धुळे (प्रतिनिधी) : राज्यभर गाजत असलेल्या शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्र. 102 मध्ये आढळून आलेल्या 1 कोटी 84 लाख 84 हजाराच्या रोकड प्रकरणी पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने अखेर गुन्हा दाखल झाला आहे. त्यात मंत्रालयातील निलंबित कक्ष अधिकारी तथा स्वीय सहाय्यक किशोर पाटीलसह तिघांना आरोपी करण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास एसडीपीओंकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणाचा केवळ ९ दिवसांत चौकशी अहवाल तयार करण्यात आला.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी १७३/३ बीएनएसएस कायद्या अंतर्गत दि. २१ मे रोजी चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीचा अहवाल आज दि. 30 मे रोजी चौकशी अधिकारी एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी केवळ ९ दिवसात चौकशी पूर्ण करून सादर केला. या चौकशी अहवालावर जिल्हा पोलिस प्रशासनाने कायदेशीर सल्लागारांचा अभिप्राय घेतला. या अभिप्रायाच्या आधारे सेक्शन अधिकारी, स्वीय सहाय्यक किशोर पाटील, राजू मोगरे आणि आणखी एका अज्ञात संशयीत आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम १२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित गुन्हा धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

तपासाची जबाबदारी एसडीपीओ उपासेंकडे
या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार तपास अधिक खोलवर जाईल आणि पुढील तपासात नव्या बाबी समोर आल्यास गुन्ह्यातील कलमे वाढवली जातील, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या प्रकरणाचा आयकर विभागानेही स्वतंत्र तपास सुरू केला आहे.

काय आहे कलम 124
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ (मुंबई पोलीस कायदा) मधील कलम १२४ मालमत्तेच्या बेकायदेशीर मालकीशी संबंधित आहे, ज्याबद्दल समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही. या कलमांतर्गत, जर कुणी व्यक्ती अशा मालमत्तेची मालकी करत असेल आणि तिच्या मालकीबद्दल समाधानकारक स्पष्टीकरण देवू शकत नसेल, तर त्याला शिक्षा होवु शकते.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ‘ती’ फाईल गंगापूररोडच्या एका बिल्डरची?

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता प्रदीप भामरे आणि भाजपचे नगरसेवक सतीश निकम (Satish Nikam) यांच्यात झालेल्या वादाच्या केंद्रस्थानी असलेली ती फाईल...