Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंच्या डुप्लीकेटवर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

एकनाथ शिंदेंच्या डुप्लीकेटवर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे | प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर राज्यात आतापर्यंत अनेक बदल पाहायला मिळत आहेत. बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपासोबत युती करत सरकार स्थापन केले.

- Advertisement -

मात्र, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासारखा हुबेहुब दिसणारा व्यक्ती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. विजय नंदकुमार माने असे त्याचे नाव असून, आतापर्यंत त्याने एकनाथ शिंदे यांच्यासारखा पोषाक परिधान करून अनेक सोहळ्यांमध्ये हजोरी लावली. मात्र आता एकनाथ शिंदे यांचा डुप्लीकेट अडचणीत आला आहे.

विजय माने यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस उपनिरीक्षक मोहनदास आप्पासाहेब जाधव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय नंदकुमार माने याच्यावर IPC 419-511, 469, 500, 501, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडिओही प्रसारित झाला होता. या व्हिडिओत माने याच्या समोर काही महिला वेगवेगळे हावभाव करत नृत्य करत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे या व्हिडिओतही माने याची वेशभुषा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी होती.दरम्यान, विजय माने हा लोकांची जाणीवपूर्वक दिशाभूल करतो, असे आनेकांचा आरोप आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या