Friday, May 3, 2024
Homeजळगावमाजी आ. गुरुमुख जगवानींसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

माजी आ. गुरुमुख जगवानींसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

संस्थेचे सचिव (Secretary of the Institute) असल्याचे बनावट प्रमाणपत्र (Fake certificate) जोडून धर्मदाय आयुक्तांकडून (Charity Commissioners) भूखंड विक्रीची परवानगी (Permission to sell plots) मिळवून पिंप्राळा शिवारातील शेत गट क्र. 338/1 क्षेत्र 66 आर, गट क्र. 339/अ क्षेत्र 95 आर असे एकूण क्षेत्र 1 हेक्टर 69 आर भुखंडाची बनावट कागदपत्रांद्वारे (forged documents) खरेदी विक्री (buy sell) केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी माजी आमदार गुरूमुख जगवाणी (Former MLA Gurmukh Jagwani)यांच्यासह अजगर अजिज पटेल (रा.भादली), हरिष मंधवाणी, नीलेश विष्णू भंगाळे, विठ्ठल गलाजी सोळंकी, मीना विठ्ठल सोळंकी, एच.ए.लोकचंदाणी (सर्व रा.जळगाव) यांच्याविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात (Taluka Police Station) गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे.

- Advertisement -

Photos # संतनगरीत उसळली भक्तांची गर्दीना.अंबादास दानवे यांचा आरोप : शिंदे सरकार शेतकरी विरोधी

शहरातील भोईटे नगरातील अशोक राणे हे वास्तव्यास असून ते कानळदा येथील जिल्हा ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष आहे तर सचिव म्हणून मधूकर भंगाळे हे आहेत. अजगर पटेल याने दि. 13 मार्च 2013 रोजी जळगाव जिल्हा ग्रामसुधार समिती या संस्थेचे 9 कार्यकारिणी सदस्यांची यादी देवून त्यात स्वत: संस्थेत सचिव असल्याचे नमूद केले होते.

तसेच संस्थेच्या मालकीची पिंप्राळा शिवारातील शेत गट क्र. 338/1 क्षेत्र 66 आर, गट क्र. 339/अ क्षेत्र 95 आर असे एकूण क्षेत्र 1 हेक्टर 69 आर हा भुखंड विक्रीची परवानगी मिळावी. यासाठी त्याने नाशिक धर्मदाय आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल केला होता.

परंतु संस्थेचे अध्यक्ष अशोक राणे यांनी पटेल यांच्या अर्जाचे अवलोकन केल्यानंतर अर्जात पटेल याने दि. 3 मार्च 2012 रोजी संस्थेची जनरल मिटींगमध्ये नवीन कार्यकारिणी निवडल्याचे म्हटले होते. कार्यकारिणीचा चेंज रिपोर्ट हा खोटे व बनावट कागदपत्रसोबत सादर करून जळगाव सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे दाखल केला असून सदर प्रस्ताव प्रलंबित असल्याचे नमूद करून चेंज रिपोर्टची प्रमाणित प्रत अर्जात जोडले आहे.

दुचाकीत ड्रेसची ओढणी गेल्याने महिला ब्रेनडेड

पाच वर्षांपुर्वी मयत झालेल्या महिलेचे कार्यकारणीत नाव

सन 2008 मध्ये मयत झालेल्या निर्मला पाटील यांचे नाव सुध्दा बनावट कार्यकारिणीमध्ये घेतले होत. तसेच पटेल यांनी आपण संस्थेचे सचिव असल्याचे शपथ पत्र सुध्दा अर्जासोबत जोडले होते. त्यानंतर कुणीही तक्रारदार नसल्याने दि. 13 जून 2013 रोजी पटेल यांचा अर्ज मंजूर होवून त्यांना विक्रीची परवानगी मिळाली होती.

बनावट कागदपत्रांद्वारे तयार केले खरेदीखत

अजगर पटेल याने जमिन विक्रीचा व्यवहार करण्यासाठी एका बँकेत बनावट कागदपत्र दाखल करून खाते उघडले. त्यानंतर बनावट कागदपत्राद्वारे खरेदीखत तयार करून भुखंड हा गुरूमुख जगवाणी यांना विकला. खरेदीखत नोंदविण्यासाठी खोटे साक्षीदार म्हणून हरिष मंधवाणी, नीलेश भंगाळे, विठ्ठल सोळंखी, मिना सोळखी आणि एच.ए.लोकचंदाणी यांची मदत घेवून सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग-2 यांच्या कार्यालयात दि. 19 जुलै 2013 रोजी एकूण 48 पानांचा खरेदी खत नोंदवून जगवाणी यांना जमिन विक्री करून जिल्हा ग्रामसुधार समिती संस्थेची फसवणूक केल्याचे अशोक राणे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

बांबरूड येथे उभ्या ट्रकच्या चाकांची केली चोरी

- Advertisment -

ताज्या बातम्या