Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधअत्याचारप्रकरणी राहुरी तालुक्यातील तरूणावर गुन्हा दाखल

अत्याचारप्रकरणी राहुरी तालुक्यातील तरूणावर गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी|Rahuri

राहुरी तालुक्यातील रोहित पवार या तरुणाने पुणे जिल्ह्यातील एका 24 वर्षीय विवाहित तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून सलग आठ महिने तिच्यावर वारंवार जबरदस्तीने शारिरीक अत्याचार केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या तरूणीने राहुरी पोलीस ठाण्यात येऊन तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत पोलिसांना माहिती दिली.

- Advertisement -

ही घटना दि. 20 एप्रिल 2021 ते 25 डिसेंबर 2021 या दरम्यान घडली. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी रोहित अशोक पवार याच्या विरोधात बलात्कार व अनुसूचित जाती जमाती कायदा कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नगर तालुक्यात घडली असल्यामुळे हा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यातून नगर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

या घटनेतील पीडीत 24 वर्षीय तरूणी ही पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एका गावातील रहिवाशी आहे. काही दिवसांपूर्वी तिची ओळख राहुरी तालुक्यातील रोहित अशोक पवार (वय 24 वर्षे, रा. वांजूळपोई ता. राहुरी) या तरूणाबरोबर झाली. ही तरूणी विवाहित असून तिच्या नवर्‍यापासून तिला एक मुलगा आहे. आरोपी याने तरूणीला लग्नाचे आमिष दाखविले. तसेच तिच्या मुलाचा संभाळ करण्याचा विश्वास दाखविला. त्यानंतर दि. 20 एप्रिल 2021 ते 25 डिसेंबर 2021 या दरम्यान तरूणीच्या संमतीशिवाय तिच्यावर नगर तालुक्यातील निंबळक बायपास, पुणे येथील हवेली तालुक्यात तसेच गुजरात राज्यातील अहमदाबाद या ठिकाणी अत्याचार केला. तरूणी ही मागासवर्गीय समाजातील आहे. हे माहीत असून देखील तिच्यावर अत्याचार करून शिवीगाळ व मारहाण केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या