Saturday, May 4, 2024
Homeनाशिकआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह माजी नगरसेवकावर गुन्हा

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह माजी नगरसेवकावर गुन्हा

नाशिक | Nashik

शहरातील भाजप (BJP) प्रदेश पदाधिकारी तथा माजी नगरसेविका इंदुमती नागरे यांचे पुत्र विक्रम नागरे (Vikram Nagre) आणि भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) यांच्यावर घोटी पोलीस ठाण्यात एकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील भरविर खुर्द (Bharvir Khurd) येथे राहणाऱ्या अनिरुद्ध शिंदे या सातपूर पोलीस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटलेल्या व्यक्तीने काल दुपारी भरवीर खुर्द ता. इगतपुरी या गावी राहत्या घरी आत्महत्या (Suicide) केली होती. यानंतर मयत शिंदे यांच्या पत्नीने घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) विक्रम नागरे आणि मुकेश शहाणे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

मयत शिंदे यांच्या पत्नी वैशाली अनिरुद्ध शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, अनिरुद्ध हे सातपूर औद्योगिक वसाहतीतील खाजगी कंपनीत नोकरीस होते. मात्र इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथे शेती असल्याने त्याठिकाणी त्यांचे नेहमी येणे जाणे होते. याठिकाणी सासू नंदाबाई धोंडू शिंदे या राहत होत्या. पंरतु, मागील एक महिन्यापासून अनिरुद्ध शिंदे यांच्याकडे सातपूर येथे राहण्यासाठी आल्या होत्या. तर अनिरुद्ध शिंदे यांच्याविरुद्ध विक्रम नागरे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station)खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात शिंदे जामिनावर सुटल्याने ते भरवीर खुर्द येथे राहत होते.

त्यानंतर अनिरुद्ध शिंदे यांच्यासह त्यांच्या मित्रांवर मोक्क्याचा गुन्हा दाखल करण्याची नागरे व शहाणे यांनी धमकी दिल्याचे फिर्यादीत शिंदे यांच्या पत्नीने नमूद केले आहे. तसेच जामिनावर असल्याने त्यांना शोधण्यासाठी सातपूर पोलिसांसह विक्रम नागरे व मुकेश शहाणे हे येत असल्याने अनिरुद्ध हे भरवीर येथे निघून गेले होते. यानंतर काल (दि. २७) रोजी त्यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी शिंदे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती आता सापडली असून त्यामध्ये विक्रम नागरे आणि मुकेश शहाणे यांच्या नावाचा समावेश आहे.

दरम्यान, सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृतांच्या नातेवाईकांनी घोटी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांना मिळालेली चिठ्ठी ही अनिरुद्ध यांनीच लिहिली आहे का? याबाबत पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर (PI Dilip Khedkar) यांनी संगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या