Sunday, September 15, 2024
HomeनाशिकNashik Crime News : खंडणीप्रकरणी संपादकावर गुन्हा दाखल 

Nashik Crime News : खंडणीप्रकरणी संपादकावर गुन्हा दाखल 

शिरवाडे वाकद | प्रतिनिधी | Shirwade Wakad

- Advertisement -

पाचोरा (Pachora) येथील आमदार-पत्रकार संघर्ष समोर आला असतानाच ठेकेदार व संपादक यांचा संघर्ष समोर आला आहे. टाकळी विंचूर (Takli Vinchur) येथील विकासकामे सुरळीत चालावे यासाठी ठेकेदाराकडे (Contractor) तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी व त्या अनुषंगाने ठेकेदाराचा साप्ताहिकात फोटो छापून बदनामी (Defamation) केल्याप्रकरणी एका साप्ताहिकाचे संपादक सुरेश आहिरे यांच्याविरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, आपण संबंधित ठेकेदाराविरोधात तक्रार अर्ज केल्याने त्यातून गुन्हा नोंद केल्याचे तसेच आपल्या जीविताला धोका असल्याबाबत संबंधित संपादकाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन पाठवले आहे…

त्र्यंबकेश्वरला भाविकांची अलोट गर्दी; देवस्थान ट्रस्टने काही तास देणगी दर्शन ठेवले बंद

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी शेखर राजाराम शेलार (वय ३९, व्यवसाय, सरकारी गुत्तेदार, रा.निफाड) यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात (Lasalgaon Police Station) दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित आरोपी सुरेश अंतू आहिरे यांनी १८ ऑगस्ट २०२२ ते ३० मार्च २०२३ या काळात वेळोवेळी फोनद्वारे त्यानंतर १२ ऑगस्ट २०२३ रोजी लासलगाव येथील गुंजाळ पेट्रोलपंपाजवळ पत्रकार असल्याचा गैरफायदा घेऊन फिर्यादी करत असलेल्या सरकारी योजनेअंतर्गतचे ग्रामपंचायत टाकळी विंचूर येथील सौर ऊर्जा प्रकल्प, भूमिगत गटार, सिमेंट रस्ते, साहित्य पुरवठा कामाच्या निविदेची पूर्तता होण्यासाठी व सदर काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी खंडणी स्वरूपात ३ लाख रुपयांची वेळोवेळी मागणी केली.

Nashik News : संभाजी स्टेडियमचे काम पूर्ण होण्यासाठी नगरसेविकेने दिला बोकड बळी

त्या अनुषंगाने फिर्यादीची त्यांच्या निफाड टाइम्स साप्ताहिकात फोटो छापून बदनामी केली, अशी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी खंडणीचा (Extortion) गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम.के.सुरासे तपास करीत आहेत.

Nashik News : खरीप हंगामात शेतकरी चिंताग्रस्त; रासायनिक खतांची टंचाई

दरम्यान, माझ्या तक्रारीनंतर चौकशी समितीचा अहवाल प्रलंबित असल्याने मला माघार घ्यावी म्हणून आमिष दाखवले. मात्र, मी त्याला बळी पडलो नाही. त्यामुळे माझ्यावर दबाब आणला जात आहे. त्यामुळे माझ्या जीविताला धोका आहे, अशी तक्रार संपादक सुरेश अहिरे यांनी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Shahaji Umap) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Sharad Pawar : “कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यात…”; अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

- Advertisment -

ताज्या बातम्या