Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमाजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; 'या' प्रकरणात छ....

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ‘या’ प्रकरणात छ. संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल

मुंबई | Mumbai
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संभाजीनगर वाळुंज एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ३५३(२) अंतर्गत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी शासनाच्या एका जीआरचा चुकीचा संदर्भ देत, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाने आता मदत देणे बंद केल्याचा आरोप केला होता. यानंतर आता आव्हाड यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

सण उत्सव काळात, महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी या उद्देशाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसाचा निधी बंद, असे परिपत्रक महसूल वन विभागाने काढलेले नसताना देखील चुकीची माहिती देऊन शासनाची जनमानसात बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा परिसरात राहणाऱ्या विजय भाऊसाहेब काळुंखे या तरुणाने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

जीवन संपवलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद झाला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे ‘लाडकी बहीण’ योजनेला दिला असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. गैरव्यवहार नाही, अशी एकही योजना ‘महायुती सरकार’कडे नाही. एकच व्यक्ती ३० जणींचे आधार कार्ड वापरून वेगवेगळे अर्ज भरतो. सर्व महिलांचे पैसे एकाच खात्यावर घेतो आणि सरकारला याचा मागमूसही नाही. आधार कार्ड ज्या महिलांची आहेत; त्यांना आपले आधार कार्ड त्या व्यक्तीपर्यंत कसं पोहोचलं याची कल्पना नाही आणि योजनेचा लाभही मिळालेला नाही. एक बरं झालं की भाजपच्याच माजी नगरसेवकाने हा गैरव्यवहार उघडकीस आणलाय. अन्यथा सरकारची बदनामी करायला विरोधकांनीच हे कृत्य केलंय, असा आरोप झाला असता, असे आव्हाड यांनी ४ सप्टेंबर रोजीच्या X वरील एका पोस्टमध्ये म्हटले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...