Wednesday, May 29, 2024
Homeनाशिकसप्तशृंगी गडावर सुरक्षा बलाच्या एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

सप्तशृंगी गडावर सुरक्षा बलाच्या एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

सप्तशृंगीगड । वार्ताहर

सप्तशृंगी गडावर मंदिर सुरक्षा साठी महाराष्ट्र सुरक्षा बल, तसेच आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तैनात करण्यात आले आहे ,रविवार दि ९ जुलै रोजी आपत्ती व्यवस्थापनच्या एक महिला कर्मचारी मंदीरात गर्दी नियंत्रित करण्यासाठी उपस्थित होती तसेच महाराष्ट्र सुरक्षा बल बंदूक शस्त्र धारी वैभव शेलार कर्मचारी देखील उपस्थित होते .

- Advertisement -

मात्र अचानक जाणूनबुजून आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी यांच्या डोक्यात महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचारी यांनी बंदूक मारली म्हणून आपत्ती व्यवस्थापन महिला कर्मचारी यांना चक्कर आले असता आपत्ती व्यवस्थापन चे अधिकारी जॉन भालेराव यांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात घेऊन गेले मात्र सुरक्षा रक्षकाला विचारपूस केल्या दरम्यान बंदूक हातातून निसटली असे कारण सांगण्यात आले.

मात्र आपत्ती अधिकारी जॉन भालेराव यांनी सीसीटीव्ही पाहणी संदर्भात सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टला पत्रव्यवहार केला असता जाणूनबुजून डोक्यात बंदूक मारल्याचे दिसून येत आहे या दरम्यान आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी यांनी बंदूक धारी वैभव शेलार विरुद्ध भांदवी कलम ३२४ प्रमाणे कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कळवण पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांचा मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी,पोलीस कर्मचारी शरद शिंदे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या