Sunday, April 27, 2025
Homeक्राईमअडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार; दिंडोरी तालुक्यातील चारोसे येथील घटना

अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार; दिंडोरी तालुक्यातील चारोसे येथील घटना

वणी | दुर्गेश दायमा
अडीच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास वणी पोलीसांनी अटक केली असून पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून वणी पोलीसांनी पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. घडलेल्या या प्रकाराबाबत परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी परिसरात केली जात आहे.

याबाबत, वणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरवारी (दि. १३) संध्याकाळी चारोसे ता. दिंडोरी जि. नाशिक येथील मुलगी आपल्या घरासमोर अंगणात खेळत असताना सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पिडीत मुलीचा चुलत काका रतन भास्कर गांगुर्डे वय २१ रा. चारोसे ता. दिंडोरी याने तिला घरासमोरून घेऊन गेला. मुलगी बराच वेळ झाली तरी दिसत नाही म्हणून तिच्या घरातील लोकांनी तिचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता रात्री ८ वाजेच्या सुमारास सदर मुलगी घरापासून काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात संशयित आरोपी मुलीसह दिसून आली.

- Advertisement -

दरम्यान, याबाबत पीडित मुलीच्या आईचा जबाब नोंदवून तक्रार दाखल करण्यात आली आहे. भा.द.वी. १८३ / २०२४ कलम ३७६(२) फ, ३७६ अब , भा.द.वी.सह कलम ४,६ पोक्सो कायद्यान्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 : आज डबल हेडर; ‘हे’ संघ भिडणार, उपांत्य फेरी...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (रविवारी) दोन सामने खेळविण्यात येणार आहेत. यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ...