Friday, May 31, 2024
HomeनाशिकNashik Crime News : उद्योजकाची अडीच कोटींची फसवणूक; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nashik Crime News : उद्योजकाची अडीच कोटींची फसवणूक; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येथील एका उद्योजकाची (Entrepreneur) दोन कोटी ६२ लाख ८३ हजार ३८२ रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल (Filed Case) करण्यात आला आहे…

- Advertisement -

Saptashrungi Bus Accident : पालकमंत्री दादा भुसेंनी केली जखमींची विचारपूस; वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना

याबाबत अधिक माहिती अशी की, सदर घटना २३ नोव्हेंबर २०२० ते १५ फेब्रुवारी २०२२ या काळात डी ७३ सातपूर एमआयडीसी (Satpur MIDC) श्यामसुंदर हॉटेलसमोर सातपूर, नाशिक या ठिकाणी घडली होती. याप्रकरणी जगदीश मोतीलाल साबू (वय ४४, रा. बोडके नगर, कमल नगर हिरावाडी, पंचवटी, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.

Rain Update : हिमाचलसह पंजाबमध्ये पावसाचा हाहाकार; हजारो कोटींचे नुकसान, अनेकांचा मृत्यू

त्या फिर्यादीत म्हटले की, साबू यांच्या कंपनीच्या मालाच्या व्यवहारातील रक्कम तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे सातपूर सेंट्रल बँकेमध्ये (Satpur Central Bank) कंपनीच्या नावाने संशयित आरोपींनी बनावट खाते (Fake Account) उघडले. त्यानंतर संशयितांनी स्वतःच्या फायद्यासाठी खात्यातून दोन कोटी ६२ लाख ८३ हजार ३८२ रुपयांचा अपहार करून साबू यांची संगनमत करत आर्थिक फसवणूक केली.

Saptashrungi Bus Accident : अपघातातील मृत महिलेच्या वारसाला दहा लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

त्यानुसार अमोल जगन्नाथ पवार (रा. १४ ए श्रीहरी अपार्टमेंट रामवाडी आदर्श नगर पंचवटी नाशिक), भूषण दिलीप पवार (रा. फ्लॅट नंबर ५ उमा रेसिडेन्सी अपार्टमेंट मखमलाबाद रोड तांबे मळा पंचवटी नाशिक), सागर शालीन पाटील (रा. माहिती नाही), आकाश नामदेव वारुंगसे (रा. माहित नाही), निरज मोहिनीराज खेडलेकर (रा. श्री कला सृष्टी हौसिंग सोसायटी फ्लॅट नंबर १९ रामवाडी आदर्श नगर पंचवटी नाशिक), देवेंद्र केदार शर्मा (रा. २ निर्मला अपार्टमेंट शाहूनगर कामटवाडी नवीन नाशिक,नाशिक) व विशाल पवार (रा. ५ उमा रेसिडेन्सी अपार्टमेंट मखमलाबाद रोड, नाशिक) यांच्याविरुद्ध भादवि कलम ४०६, ४६५, ४७१, ४२०, ३४ प्रमाणे सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

सप्तश्रृंगी गड घाटात बस दरीत कोसळली, १८ जखमी

- Advertisment -

ताज्या बातम्या