Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा; ठाकरेंना उत्तर देणाऱ्या कावड यात्रेत...

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा; ठाकरेंना उत्तर देणाऱ्या कावड यात्रेत फिरवली तलवार

हिंगोली | Hingoli

शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Hingoli Mla Santosh Bangar) पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, संतोष बांगर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या यात्रेला कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी जमली होती. यावेळी बांगर यांनी हातात तलवार दाखवत शक्ती प्रदर्शन केल्या प्रकरणी कळमनुरी पोलिसांनी (Kalamnuri Police Station) त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची हिंगोली जिल्ह्यात सभा झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या वतीने कावड यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेतून आमदार बांगर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कळमनुरीच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिराजवळ बांगर समर्थकांनी त्यांचा सत्कार यांना तलवार भेट दिली. मात्र भेट मिळालेली तलवार आमदार बांगर यांनी बाहेर काढत हातात घेऊन नाचवली.

‘मी अजून दारूला …; द्राक्ष बागायत संघाच्या परिषदेत अजित पवारांची तुफान टोलेबाजी

या सर्व घटनेचा व्हिडीओ समोर आल्यावर आमदार बांगर यांच्याविरोधात कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये आर्मस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची परवानगी न घेता डीजे लावला असेही पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

उध्दव ठाकरे काय म्हणाले होते

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीत जाहीर सभा घेतली होती. या सभेतून त्यांनी संतोष बांगर यांच्यावर जोरदार टीका केली होती. गद्दाराची नाग समजून पूजा केली. पण, हा नाग उलटा फिरून डसायला लागला. साप पायाखाली आल्यावर काय करायचे तुम्हाला कळते. पुंगी वाजवली, दूध पाजले, सगळे वाया गेले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा पाऊस कधी बरसणार? हवामान विभागाने वर्तविला ‘हा’ अंदाज, वाचा सविस्तर

काल श्रावण महिन्यातील सोमवार असल्यामुळे त्यांनी कावड यात्रा काढत महादेवाचा अभिषेक केला. त्याचबरोबर त्यांनी आपल्या अंगावर भगवे कपडे नेसत गळ्यात आणि दंडावर रूद्राक्षांच्या माळा घातल्या होत्या. त्यांच्या नवीन लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याचबरोबर कार्यकर्ते आणि आमदार बांगर यांनीसुद्धा डीजेच्या तालावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बांगर यांनी तलवार दाखवत प्रदर्शन केले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या