Saturday, November 23, 2024
Homeनाशिकमतदान केंद्र प्रमुखावर हल्ला करण्याचा प्रयत्न; पती, पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

मतदान केंद्र प्रमुखावर हल्ला करण्याचा प्रयत्न; पती, पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

लोकसभा निवडणूकीच्या (Loksabha Election) के के वाघ इंग्लिश स्कुल, सरस्वती नगर येथील बुथ क्र. ८८ वर मतदान केंद्रावर मतदान (Voting) सुरू असतांना बुथसमोरील आठ ते दहा मतदारांच्या रांगेमधून सर्व मतदारांना ओलांडून बुथमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती, पत्नीस रांगेमध्ये येण्याची विनंती करीत असलेल्या केंद्र प्रमुखास अरेरावी करत व धमकी देत जीव मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती, पत्नीसह मुलावर सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचा गुन्हा म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, संशयित अरूण सरदारसिंग परदेशी (वय ६०), अक्षय अरूण परदेशी (वय २४, रा. फ्लॅट नंबर ओ २४, सुशिलनगरी, माने नगर, रासबिहारी रोड, म्हसरूळ) असे संशयितांची नावे असून, यात एका महिलेचा समावेश आहे. सरस्वती नगर येथील के के वाघ इंग्लिश स्कुल येथे मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असताना पती, पत्नीसह त्यांच्या मुलाने गोंधळ घातल्याची घटना घडली. मतदान केंद्र प्रमुखाशी अरेरावी करत ‘तु बाहेर ये, तुझे तोंडामध्ये दोन थोबाडीत देतो. तु काम संपवून बाहेर ये मग तुझ्याकडे पाहतो. अशी धमकी दिली.

त्यानंतर केंद्र प्रमुखाने ही बाब म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांना सांगितली. यानंतर काही पोलीस अधिकाऱ्यांनी पती, पत्नीस समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असता पत्नीने पायातील चप्पल काढून पोलीस अधिकाऱ्यावर धावून जावून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांना शिवीगाळ केली. डीजी ऑफीसमध्ये माझे भाउ आहेत. मी तुला त्यांचेसमोर हजर करतो. तुला वर्दीची जास्त मस्ती आली आहे. मी तुझेकडे पाहून घेतो अशी धमकी दिली.

केंद्र प्रमुख पोलीस वाहनातून पोलीस ठाण्याला जाण्यासाठी निघून कॉलेजच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडून प्रकरण शांत होण्यासाठी काही काळ रस्त्याचे बाजूला थांबलो असता पती, पत्नीने पुन्हा पोलीसांच्या वाहनाजवळ जात दरवाजा उघडून त्यास बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात सुहास विलास धारणे (वय ४९, रा. फ्लॅट नं ३, हर्षवर्धन सोसायटी, मखमलाबाद नाका) यांच्या फिर्यादी वरून गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या