नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad
येथील एका हॉटेल चालकाकडे दहा हजार रुपये हप्ता दे अशी धमकी देत खंडणी मागणाऱ्या चार संशयित युवकांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाच दिवशी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दोन खंडणीचे गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
या संदर्भात दिनेश दिलीप दासवानी 40 रा,छाया निवास,नाशिकरोड यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्यांचे घराखाली हॉटेल किरण नावाचे हॉटेल असून शनिवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान संशयित राजू शेख, अजीम राजू शेख व त्यांचे दोन साथीदार एम एच 15 ए के 5576 या रिक्षात आले व धारदार शस्त्रे दाखवित शिवीगाळ करीत गोंधळ घातला,अजीम शेख याने आम्ही रेल्वे स्टेशनचे भाई आहोत तुला व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला महिन्याला दहा हजार हप्ता द्यावा लागेल असा दम भरला.
दरम्यान यावेळी अनेक नागरिक जमा झाल्याने शेख व त्यांच्या साथीदारांनी रिक्षा सोडून पळ काढला व जाताजाता तुम्हाला पुढच्या वेळेस मारून टाकीन सोडणार नाही असा दम दिला,दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी पथकासह घटनासाठी धाव घेत रिक्षा ताब्यात घेतली असून संशयित व्यक्तींचा शोध सुरू आहे,दासवानी यांनी दिलेल्या तक्रारी वरुण पोलिसांनी संशयित विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माळी करीत आहेत,




