Monday, June 17, 2024
Homeक्राईमनवापुरात माजी नगरसेवकाच्या मोटरसायकलीतून साडेचार लाखाची रोकड लंपास

नवापुरात माजी नगरसेवकाच्या मोटरसायकलीतून साडेचार लाखाची रोकड लंपास

नवापूर | श. प्र.-

- Advertisement -

नवापूर शहरातील देवळफळी भागातील नॅशनल हायवे ६ वरील उड्डाणपुलाखाली काल दि.१० जुन रोजी ८.३० वजेच्या दरम्यान माजी नगरसेवक फारुक शहा व त्यांचा मित्र शब्बीर शहा दुकानावर चहा पित असताना जवळच त्यांची स्कूटी (क्र.एम.एच.३९ ए.१३४४) लावली असता त्यांच्या मोटार सायकलीच्या डिकीतुन ४ लाख ५० हजाराची रोख रक्कम अज्ञात व्यक्तीने लंपास केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील इस्लामपुरा भागात राहाणारे माजी नगरसेवक फारुक शहा यांनी धुळे स्टील या दुकानातून ३ लाख रुपये घेतले. त्यानंतर नवापूर येथे नारायणपुर रोड भागात असलेले सी.ए. वतन अग्रवाल यांच्याकडुन १ लाख ५ ० हजार घेतले अशी एकुण ४ लाख ५० हजार रुपयांची रोकड त्यांनी मोटार सायकलच्या डिकी मध्ये ठेवली.  त्यानंतर ते त्यांचा मित्र शबीर शहा यांना घेऊन शहरातील देवळफळी भागातील नॅशनल हाय वे ६ च्या उड्डाणपुलाखाली चहाच्या दुकानावर चहा पिण्यासाठी थांबले असता त्यांच्या मोटार सायकलीची डिकी तोडुन डिकीतुन ४ लाख ५० हजाराची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याबाबत नवापूर पोलीस ठाण्यात फारुक शहा यांनी फिर्याद दिली आहे. घटनेचा तपास उपनिरीक्षक मनोज पाटील, पो.हे. कॉ.प्रेम जाधव करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या