धुळे । dhule। प्रतिनिधी
साक्री तालुक्यातील जैताणे येथील चिकन विक्रेत्याच्या (chicken seller’s) घरातून चोरट्यांनी पावणे चार लाखांची रोकड लपांस (stolen) केली. याप्रकरणी निजामपूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
- Advertisement -
याबाबत फिरोज यासीन खाटीक (वय 35 रा. ग्रामपंचायत जवळ, जैताणे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याचे चिकन शॉप असून दि. 23 रोजी सकाळी 10 ते दि. 24 रोजी सकाळी 11 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटाचे लॉक तोडून त्यातील 3 लाख 75 हजारांची रोकड लंपास केली. अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय सुनिल वसावे करीत आहेत.