Monday, May 20, 2024
Homeमुख्य बातम्याबिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी सीबीआयकडून छापेमारी

बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी सीबीआयकडून छापेमारी

नवी दिल्ली | New Delhi

बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राजद नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची पत्नी राबडी देवी (Rabri Devi) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कथित जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणात सीबीआयचे पथक राबडी देवी यांच्या घरी पोहोचले असून सीबीआयच्या (CBI) अधिकाऱ्यांकडून राबडी देवी यांची चौकशी सुरू आहे…

- Advertisement -

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत अवकाळीचे सावट

राबडी देवी यांच्या घरी सीबीआयचे पथक पोहोचल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच सध्या राबडी देवी यांच्यासोबत घटनास्थळी त्यांचे पुत्र तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) हे देखील उपस्थित असून एक वकिलांचे पथक राबडी देवींच्या घरी पोहोचले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) काल देशातील विरोधी पक्षांच्या ९ नेत्यांनी यंत्रणाच्या राजकीय वापरावरुन पत्र लिहिले होते. त्यामध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राबडी देवींचे पुत्र तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांचाही समावेश होता. त्यानंतर आज सीबीआयने त्यांच्या घरी छापा (Raid) टाकला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

महानायक अमिताभ बच्चन यांचा शूटिंगदरम्यान अपघात, बरगड्यांना इजा

नेमकं प्रकरण काय?

लालू प्रसाद यादव यांनी रेल्वेमंत्री असताना जमिनीच्या मोबदल्यात विना जाहिराती ‘ग्रुप डी’मध्ये १२ लोकांना रेल्वेत नोकरी दिल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. लालू प्रसाद यादव २००४ ते २००९ मध्ये रेल्वेमंत्री होते. सीबीआयने या प्रकरणी १८ मे रोजी एक गुन्हा नोंद केला होता. तसेच लालू प्रसाद यादव यांच्या परिवाराने १.०५ लाख स्क्वेअर फुट जागेवर कथितपणे कब्जा केल्याचा दावा सीबीआयचा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या