नाशिक। प्रतिनिधी Nashik
संबंधित नागरिकांना एजंटमार्फत पैसे घेऊन पासपाेर्ट वितरित करणाऱ्या मुंबई व नाशिकच्या पासपाेर्ट सेवा केंद्रातील ३२ अधिकारी, एजंटांच्या विविध ३३ ठिकाणांवर केंद्रीय अन्वेषन ब्युराेने (सीबीआय) छापेमारी केली. यात काही अधिकारी व एजंटांकडून संशयास्पद आर्थिक व्यवहाराचे पुरावे, कागदपत्रे, माेबाईल, संगणक आदी डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.
- Advertisement -
सीबीआयने काही दिवसांपूर्वीच पासपोर्ट सहाय्यक आणि मुख्य पासपाेर्ट अधिकारी व एजंटाविराेधात पैसे घेऊन अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे पासपाेर्ट मंजूर केल्याचे १२ गुन्हे नोंदवले आहेत. त्यानुसार एकूण ३३ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. सीबीआयने नाशिकमधील काही पासपाेर्ट अधिकारी, सेवा केंद्रांचे चालक, एजंटांना ताब्यात घेतले आहे.