Tuesday, April 1, 2025
Homeमनोरंजनअभिनेता सुशांतची हत्या झाल्याचे पुरावे नाहीत

अभिनेता सुशांतची हत्या झाल्याचे पुरावे नाहीत

नवी दिल्ली | New Delhi –

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी तपास

- Advertisement -

सीबीआयकडे सोपवला होता. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयदेखील या प्रकरणी सुशांतशी निगडीत असलेल्या अनेक व्यक्तींची चौकशी केली. दरम्यान, या प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि अन्य व्यक्तींच्या चौकशीतून अनेक माहितीही समोर आली. परंतु त्याच्या मृत्यूचं गुढ उकलण्यात मात्र अद्यापही यश आलेलं नाही. सुशांतची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे अद्याप सापडले नसल्याची माहिती सीबीआयच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. आताही या प्रकरणाची चौकशी सुरूच असल्याचंही त्यांनी सांगितलं.

एका वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सध्या आत्महत्येच्या अँगलवरही आपण लक्ष देत असल्याचं अधिकार्‍यांनी सांगितलं. तसंच सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचं हे प्रकरण आहे का याचाही तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत सीबीआयनं क्राईम सीन रि-क्रिएट केला. तसंच मुंबई पोलिसांद्वारे जमवण्यात आलेल्या पुराव्यांचा तपास आणि या प्रकरणाशी निगडीत सर्व संशयितांची चौकशीही करण्यात आली आहे.

फॉरेन्सिक रिपोर्ट, संशयितांचे जबाब आणि क्राईम सीन रिक्रिएशनकडे पाहता यात हत्येकडे बोट दाखवणारे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं टीमचं म्हणणं आहे. अद्यापही या प्रकरणाची तपास सुरू आहे. तसंच आत्महत्येच्या अँगलवरही तपास केला जाणार असल्याचंही अधिकार्‍यांनी सांगितलं.

या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा एम्सच्या फॉरेन्सिक टीमचा अहवाल आहे. यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदनाचा आणि ऑटोप्सी रिपोर्टही आहे.

दरम्यान, मंगळवारी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीच्या आई-वडिलांचीही चौकशी केली. तसंच ड्रग्सचा अँगल आल्यामुळे ईडीनं गौरव आर्यालाही चौकशीसाठी बोलावलं होतं.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे दिल्लीत धरणे आंदोलन

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आयटक संलग्न संघटनांच्या महासंघाच्या अंतर्गत दिल्ली (Delhi) येथील जंतरमंतर येथे नाशिकच्या (Nashik) बांधकाम कामगारांनी (Construction Workers) भव्य धरणे आंदोलन (Agitation)...